हरभरा
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३० ते ४५ दिवसांत शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २० ते २५ दिवसांचे असताना पहिली कोळपणी आणि ३० ते ३५ दिवसांचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळींतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपांतील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी करावी. यासाठी गरजेनुसार एक किंवा दोन खुरपण्या वेळीच कराव्यात. मजुरांअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास, पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथॅलिन (३० ईसी) या तणनाशकाची १ ते १.२ लिटर प्रति एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.