कापूस पिकातील गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

 कापूस

गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन 

👉परतिबंधात्मक उपाय म्हणून पीक पात्या लागण्याच्या अवस्थेत असताना निंबोळी अर्क ५० मि.लि. अधिक नीम तेल ५ मि.लि. अधिक डिटर्जंट पावडर १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 

👉पतंगांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी दोन पेक्टीनोल्युर अथवा गॉसिपल्युर सक्रिय घटक असणारे कामगंध सापळे लावावेत. दर आठवड्याला सापळ्यात अडकलेल्या पतंगांची निरीक्षणे नोंदवावीत. आर्थिक नुकसान पातळी (सलग तीन रात्री ८ पतंग/सापळा/रात्र) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी. 

👉परादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात. १०% डोमकळ्या ही आर्थिक नुकसान पातळी समजून फवारणीचे उपाय करावेत. 

👉हिरवी बोंडे लागल्यानंतर अनिश्चित स्वरूपात एकरी २० बोंडांचे (१ बोंड/झाड) निरीक्षण करावे. आर्थिक नुकसान पातळी (१०% प्रादुर्भावग्रस्त बोंडे) ओलांडल्यास शिफारशीत कीटकनाशकांची त्वरित फवारणी करावी. 

👉 उपलब्धतेनुसार ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी मित्रकीटकाचे ६०,००० प्रतिएकर प्रमाणे पात्या-फुले लागण्याच्या अवस्थेपासून पंधरा दिवसांच्या अंतराने तीनदा प्रसारण करावे. 

👉जविक घटकांचा कीड नियंत्रणासाठी वापर करण्याच्या किमान एक आठवडा आधी आणि एक आठवडा नंतर रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू नये. 

👉कपाशीच्या वाढीनुसार गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी शिफारस केलेली कीटकनाशके (फवारणी प्रतिलिटर पाणी) 

पेरणीनंतर ६०-९० दिवस: क्विनॉलफॉस (२५ एएफ) २ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम 

पेरणीनंतर ९०-१२० दिवस: क्लोरपायरीफॉस (२० ईसी) २.५ मि.लि. किंवा थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २ ग्रॅम 

>पेरणीनंतर १२० दिवस: फेनव्हलरेट (२० ईसी) १ मि.लि. किंवा सायपरमेथ्रिन (१० ईसी) १ मि.लि.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post