हळद
दुपारच्या वेळी साधारणतः
तापमान ३५ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यानंतर हळदीची पाने गोलाकार झालेली दिसतात. हा कोणताही रोग नसून, जास्त उन्हापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पिकाची नैसर्गिक क्रिया आहे. अशी पाने तापमान कमी झाल्यानंतर पुन्हा सरळ होतात. शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना मोठ्या प्रमाणात तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. तसेच फुलांचे दांडे न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी नव्याने येतच राहतात. परिणामी फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक ठरते. त्याचप्रमाणे फुले काढतेवेळी खोडाला इजा झाल्यास त्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. कंदकूज वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.