करडई : महत्वाचे तेलबिया पीक


 ✍️ डॉ. विजय अमृतसागर, डॉ. शहाजी शिंदे,

🏛 अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्प, सोलापूर

महाराष्ट्र राज्याचे विशेषतः रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. रब्बीत पाण्याचा ताण पडला, तरी हे पीक काही प्रमाणात उत्पादन देऊन जाते. कारण या पिकाच्या मुळ्या जमिनीत १४० ते १५० सेंटिमीटर खोलवर जाऊन ओलावा शोषून घेतात. करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लांचे प्रमाण इतर तेलांपेक्षा बरेच कमी असते. त्यामुळे हृदयरोग्यांना हे तेल वापरणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. शरीरात रक्तातील कोलेस्टेरॉलची मात्रा प्रमाणाबाहेर वाढू नये, म्हणून इतर तेलांबरोबर या तेलाचा उपयोग करणे फायदेशीर आहे. म्हणूनच करडईच्या तेलाची बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.
 🌱जमीन : करडईच्या पिकास मध्यम ते भारी खोल जमीन वापरावी. साठ सेंटिमीटरपेक्षा जास्त खोल जमिनीत करडईचे पीक चांगले येते. त्याचप्रमाणे जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि ओलावा टिकवून ठेवणारी असावी. पाणी साचून राहिल्यास करडईच्या पिकास अपाय होतो. थोड्या फार चोपण जमिनीतही हे पीक येऊ शकते.

संपूर्ण लेख कृषिक अँप मध्ये वाचा......

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.






Post a Comment (0)
Previous Post Next Post