हळद
हळद पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर १५ ते २६ आठवडे (कंद वाढीची सुरुवात) या अवस्थेमध्ये १२ समान हप्त्यांमध्ये १.२५ किलो नत्र, १.२५ किलो स्फुरद व ०.७५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खातांद्वारे देण्यासाठी २ किलो १२:६१:००, २.२५ किलो युरीया व १.५ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.
लागवडीनंतर २७ ते ३२ आठवडे (कंद तयार होण्याची अवस्था) या अवस्थेमध्ये ठिबक सिंचनद्वारे ६ समान हप्त्यांमध्ये १.५ किलो नत्र, १ किलो स्फुरद व २ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १.५ किलो १२:६१:००, ३ किलो युरीया व ४ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.