भात
पीक निसवल्यानंतर साधारणतः २५ ते ३० दिवसांनी लोंबीत दाणे पक्व झाल्यावर भाताची कापणी करावी. वक्तशीरपणे कापणी केल्याने भात भरडताना कणीचे प्रमाण कमीत कमी राहते. कापणी करण्याच्या आधी ७ ते १० दिवस भात पीक असलेल्या खाचरातून सर्व पाणी काढून टाकावे. यामुळे पीक लवकर पक्व होते. लोंब्यांतील धाय/ दाणे रंग बदलू लागतात. पक्व झाल्यावर त्यांचा टणकपणा लोंब्यांना स्पर्श करताच जाणवतो. लोब्यांचा रंग पिवळट होऊन त्यातील दाणे हे पक्व होणे गरजेचे आहे. संपूर्ण भात खाचरातील असे भात पीक पक्व झाल्यावर ते कापणीयोग्य झाले असे समजावे. प्रचलित पद्धतीमध्ये भाताची कापणी त्यामधील ओलाव्याचे प्रमाण अंदाजे १६ ते १८ टक्के असताना करतात. भात जास्त वाळविल्यामुळे कापणीच्या वेळी दाणे गळून पडतात, त्यामुळे होणारे नुकसान हे ५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. तांदळात तुकड्यांचे प्रमाणही वाढते. अशा तांदळाला पॉलिशसुद्धा चांगल्या प्रकारे करता येत नाही, त्यामुळे दाण्यांतील ओलाव्याचे प्रमाण २० ते २१ टक्के इतके असताना कापणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.