आले
आले पिकामध्ये ठिबक सिंचनद्वारे लागवडीनंतर १५ ते २६ आठवडे (कंद वाढीची सुरुवात) या अवस्थेमध्ये १२ समान हप्त्यांमध्ये ०.७५ किलो नत्र, ०.५६ किलो स्फुरद व ०.५६ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खातांद्वारे देण्यासाठी १ किलो १२:६१:००, १.५ किलो युरीया व १ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे. लागवडीनंतर २७ ते ३२ आठवडे (कंद तयार होण्याची अवस्था) या अवस्थेमध्ये ठिबक सिंचनद्वारे ६ समान हप्त्यांमध्ये ०.९० किलो नत्र, ०.७५ किलो स्फुरद व १.५ किलो पालाश प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात द्यावे. ही खतमात्रा विद्राव्य खतांद्वारे देण्यासाठी १.२५ किलो १२:६१:००, १.५ किलो युरीया व ३ किलो सल्फेट ऑफ पोटॅश प्रति आठवडा प्रति एकर द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.