तूर पिकातील कीड नियंत्रण

 तूर

कीड नियंत्रण 

शेगा पोखरणारी अळी - सुरवातीच्या काळात अळ्या कोवळी पाने, फुले किंवा शेंगा भरताना कोवळे दाणे खातात. 

पानाफुलांची जाळी करणारी अळी - फुलोऱ्यापासून किडीचा प्रादुर्भाव दिसतो. कमी कालावधीत येणाऱ्या जाती व जास्त आर्द्रता असलेल्या भागात किडींचा प्रादुर्भाव दिसतो. अळ्या पाने, फुलकळ्या आणि शेंगा एकत्र करून त्यांचा गुच्छ करून लपून बसतात. त्यामुळे  कोवळे शेंडे, पाने आणि शेंगा एकमेकांना चिकटून खोडाची व शेंगांची वाढ खुंटते. 

पिसारी पतंग - कळी, फुलोरा अवस्थेपासून ते काढणीपर्यंत किडीचा प्रादुर्भाव दिसतो. अळ्या कळी, फुले व शेंगांना छिद्रे पाडून आतील भाग खातात. पूर्ण वाढलेल्या अळ्या शेंगा किंवा शेंगांवरील छिद्रांमध्ये कोषावस्थेत जातात. 

🛡️  उपाययोजना 

1️⃣  पहिली फवारणी - पिकास फुलकळी येताना, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. 

2️⃣  दुसरी फवारणी - पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना, एचएएनपीव्ही (२५० एलई) २ मि.लि. किंवा बॅसिलस थुरिन्जिएन्सिस २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी. 

3️⃣  तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनी, इंडोक्झाकार्ब (१४.५ एससी) ०.७ मि.लि. किंवा इमामेक्टीन बेंझोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post