रब्बी ज्वारी | जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांची मात्रा |

 रब्बी ज्वारी


जमिनीच्या प्रकारानुसार रासायनिक खतांची मात्रा 

👉हलकी जमीन - जिरायती जमिनीत एकरी १० किलो नत्र पेरणीचे वेळी द्यावे. 

👉मध्यम जमीन - जिरायती मध्यम जमिनीत एकरी १६ किलो नत्र, ८ किलो स्फुरद आणि बागायती मध्यम जमिनीत ३२ किलो नत्र, १६ किलो स्फुरद व १६ किलो पालाश प्रति एकरी द्यावे. 

👉भारी जमीन - जिरायती भारी जमिनीत एकरी २४ किलो नत्र, १२ किलो स्फुरद आणि बागायती भारी जमिनीत ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद व २० किलो पालाश प्रति एकरी द्यावे. 

जिरायती जमिनीत संपूर्ण नत्र आणि स्फुरद पेरणीच्या वेळी दोन चाड्याच्या पाभरीने पेरून द्यावे. बागायती जमिनीस अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. तर राहिलेले नत्र पेरणीनंतर एक महिन्याने द्यावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post