शेळी पालन :-
पावसाळ्यातील आरोग्य व्यवस्थापन
👉शेळ्यांना पावसाळ्याअगोदर व पावसाळ्यानंतर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वेळापत्रकानुसार लाळ्या खुरकूत, आंत्रविषार, घटसर्प व पीपीआर या रोगांच्या प्रतिबंधक लसी देऊन घ्याव्या.
👉मे व सप्टेंबर महिन्यात शेळ्यांना त्यांच्या वजनानुसार जंतनाशकाची योग्य मात्रा देऊन जंत निर्मूलन करून घ्यावे. कारण ढगाळ व दमट हवामान जंतांच्या वाढीसाठी पोषक असते.
👉शेळ्यांना लस कधीही रोग आल्यानंतर देऊ नये, कारण आजारी व विशिष्ट रोगाच्या साथीमध्ये रोग झालेल्या शेळीला लस दिल्यास तो रोग बरा न होता बळावतो.
👉पावसाळ्यामध्ये जखमांवर माश्या बसून त्या चिघळणार नाहीत, याची काळजी घ्यावी व माश्यांचा आवश्यक तो बंदोबस्त करावा. यासाठी कडुनिंब, निरगुडी किंवा करंज पाला यांचा वापर करून गोठ्याचे निर्जंतुकीकरण करावे.
👉पावसाळ्यात शेळ्यांच्या खुरांमध्ये जखमा होऊन त्या चिघळू शकतात. यासाठी अशा शेळ्यांना कोरड्या जागेत ठेवून त्या जखमा पोटॅशिअम परमॅग्नेटने धुऊन त्यावर मलमपट्टी करावी.
👉पावसाळ्यात गोठ्याच्या प्रवेशद्वाराजवळ चुना टाकावा, तसेच गोठ्यातील जमिनीवरही चुना भुरभुरावा. जेणेकरून शेळ्यांना बाहेरून येणाऱ्या रोगांचा कमीत-कमी प्रादुर्भाव होईल.
👉पावसाळ्यात नवीन शेळ्या शक्यतो विकत घेऊ नयेत. घेतल्यास किमान तीन आठवडे या शेळ्यांना काहीही रोग नाही, याची खात्री केल्याशिवाय मुख्य कळपात मिसळू नयेत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.