पशु संवर्धन | लाळ्या-खुरकूत आजाराचे प्रतिबंध |

पशु संवर्धन:-

लाळ्या-खुरकूत 

या आजारात मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी जनावराची कार्यक्षमता खूप कमी होते, आर्थिक नुकसान होते. देशी जनावरांमध्ये मृत्यूचे प्रमाण अल्प असून संकरित दुभत्या जनावरांत दुग्धोत्पादन घटणे, प्रजोत्पादनक्षमता कमी होणे, वांझपणा येणे इत्यादी नुकसान होऊ शकते. बैलांची शेतीकामाची क्षमता घटणे किंवा नष्ट होणे, जनावरांच्या विक्रीत, मांसाच्या निर्यातीत, चामड्याच्या उद्योगात घट होऊन पशुपालकांना व देशाला खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागते. आजारातून जनावर बरे होण्याचा कालावधी अधिक असून, कालावधीनुसार उपचाराचा खर्च वाढत जातो. दुधाळ जनावरास कासेवर पुरळ येऊन कासदाह झाल्यामुळे दूध उत्पादनात मोठी घट होते. गाभण जनावरांत गर्भपात होऊ शकतो. काही जनावरांत तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वांझपणा येऊ शकतो. खुरांची जखम वाढून त्यात अळ्या होतात. पूर्ण खूर गळून पडू शकते. जनावरात कायमस्वरूपी लंगडेपणा येऊ शकतो. जनावरांच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन अशी जनावरे उष्णता सहन न झाल्याने कायम धापा देत असतात. त्वचेवर केसांची वाढ व्हायला लागते व लहान जनावरांची वाढ खुंटते. हृदयात कमकुवतपणा येऊन लहान वासरांचा जागीच मृत्यू होऊ शकतो. 

🛡️प्रतिबंध

👉आजार विषाणूजन्य असल्यामुळे यावर ठोस कोणताही उपचार नाही. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी लसीकरण हाच एकमेव उपाय आहे.  

👉निरोगी जनावरांना वर्षातून दोनवेळा मार्च-एप्रिल व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लाळ्या-खुरकूत रोगाचे लसीकरण करून घ्यावे.  

👉गाय, म्हैस, शेळी व मेंढीवर्गीय जनावरात वासरू/ पिलू ४ महिन्याचे झाल्यावर प्रथम मात्रा द्यावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post