खरीप कांद्याचे खत नियोजन तसेच पीक संरक्षण.

कांदा-लसूण


🧅खरीप कांद्याचे उभे पीक नत्र खताचा पहिला हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता १० किलो प्रति एकर या प्रमाणात पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. पुनर्लागवडीनंतर ४५, ६० आणि ७५ दिवसांनी फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-२ ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात द्यावे. नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

🛡️पीक संरक्षण
सतत तीन दिवस पाऊस, ८५ टक्क्यांपेक्षा जास्त सापेक्ष आर्द्रता आणि ढगाळ वातावरण असल्यास काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तो टाळण्यासाठी शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करून घ्यावा. 

काळा करपा नियंत्रण (फवारणी प्रति लिटर पाणी) 

मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम, 

यासोबत फुलकिडींचा प्रादुर्भाव असल्यास, 

फिप्रोनिल १ मि.लि. 

गरजेनुसार पुढील फवारणी १५ दिवसांच्या अंतराने, ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. किंवा हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम अधिक प्रोफेनोफॉस १ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post