टोमॅटो पिकावरील रोगांचे नियंत्रण.

टोमॅटो
रोग नियंत्रण

⭕️लवकर येणारा करपा (अर्ली ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘अल्टरनेरीया सोलॅनी’
⭕️उशीरा येणारा करपा (लेट ब्लाइट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा इन्फेस्टन्स’
⭕️फळसड (बक आय रॉट) - रोगकारक बुरशी ‘फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासीटीका’
⚔️एकात्मिक व्यवस्थापन
👉पिकाची फेरपालट करावी.
👉बियाणे प्रमाणित व निरोगी असावे.
👉थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
👉रोपवाटिकेत मॅन्कोझेब २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
👉लागवडीवेळी एकरी २ किलो ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून द्यावे.
👉पनर्लागवडीपूर्वी कार्बेन्डाझीम १ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून नंतरच लावावीत.
👉झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळा करून जमिनीत गाडावीत अथवा जाळून नष्ट करावीत.
👉रोगाची लक्षणे दिसताच, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मॅन्कोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३ ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल १ मि.लि. उशीरा येणारा करपा आणि फळसड रोगांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रतिलिटर पाणी) मेटॅलॅक्झील एम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा फोसेटील एएल २.५ ग्रॅम

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post