आंबा
ज्या बागांचे सरासरी वयोमान ३५ ते ४० वर्षांपेक्षा जास्त आहे, कलमे उंच वाढली आहेत आणि उत्पादनामध्ये घट झाली आहे, फळाचा आकार कमी झालेला आहे. अशा बागांचे/ झाडांचे पुनरुज्जीवन करून त्यांना पुन्हा उत्पादनामध्ये आणणे अत्यंत आवश्यक आहे. पुनरुज्जीवनासाठी ऑक्टोबर/मार्च महिन्यामध्ये कलमाची छाटणी ८ ते १० फुटांवर करावी. छाटणी केल्यानंतर लगेचच कीडनाशकांची फवारणी करावी.
आंबा पिक | आठवडी सल्ला | तण तसेच कीड नियोजन
अशा कलमांना नवीन फुटवे आल्यावर त्यांची विरळणी करून संपूर्ण कलमावर नवीन पालवी विकसित करावी. अशा प्रकारे कलमाची छाटणी करून त्यांना पुन्हा उत्पादनामध्ये आणण्यासाठी सुमारे २ ते ३ वर्षांचा कालावधी लागतो. या दरम्यान रोग व किडीपासून संरक्षण तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पुनरुज्जीवन केल्यानंतर झाडांचे उत्पादन, फळांचा आकार यामध्ये लक्षणीय वाढ होते तसेच रोग किडींचा प्रादुर्भाव कमी होऊन उत्पादन खर्चात बचत होते.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.