जनावारतील लंपी स्कीन डिसीज लक्षणे व उपचार

 पशु संवर्धन :-
लंपी स्कीन डिसीज

🐄लक्षणे
👉हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दुग्धोत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
👉सरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इत्यादी भागात येतात.
👉बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात.
👉डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.
👉नयूमोनिया व श्वसनसंस्थेशी संबंधित लक्षणे आढळतात.
👉अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

⚔️ उपचार
👉हा आजार विषाणूजन्य असल्याने यावर खात्रीशीर उपचार होऊ शकत नाही. परंतु विषाणूजन्य आजाराची बाधा झालेल्या जनावरास प्रतिकारशक्ती कमी झाल्याने इतर जिवाणूजन्य आजाराची बाधा होण्याची दाट शक्यता असल्याने जिवाणू प्रतिबंधक औषधी म्हणजे प्रतिजैविके देणे आवश्यक आहे.
👉तयासोबत ताप कमी करणारी औषधे, प्रतिकारशक्ती वर्धक जीवनसत्त्व अ व ई तसेच त्वचेवरील व्रणांसाठी मलमाचा वापर करणे गरजेचे आहे.
👉वदनाशामक व अँटि हिस्टॅमिनिक औषधांचाही आवश्यकतेप्रमाणे वापर करावा.
👉जनावरास मऊ व हिरवा चारा व तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे.
👉तोंडातील व्रणाला २% पोटॅशिअम परमॅग्नेट द्रावणाने धुऊन तोंडात बोरो ग्लीसरीन लावावे.
👉लिव्हर टॉनिकच्या वापराने जनावरे लवकर बरे होण्यास मदत होते.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post