तूर
जास्त पावसामुळे शेतातून पाणी जास्त वाहिले असल्यास पाण्याबरोबर नत्र वाहून जाण्याची शक्यता असते. तुरीची खालची पाने पिवळी पडली असल्यास नत्राची कमतरता लक्षात घेऊन दोन टक्के युरियाची किंवा दोन टक्के डीएपी ची (२ किलो प्रति १०० लिटर पाणी) फवारणी फायदेशीर ठरू शकते. फवारणी शक्य नसल्यास अशा शेतामध्ये निंबोळी पेंड एक पोते व युरिया अर्धा पोते प्रतिएकरी कोळपणी देण्यापूर्वी वापरावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.