सोयाबीन
विषाणूजन्य रोग
⭕️हिरवा मोझॅक या रोगाने ग्रस्त झालेल्या झाडांची वाढ खुंटलेली दिसते. पाने आखूड, लहान, जाडसर व सुरकुतलेली होतात. अशा झाडांना शेंगा कमी व त्याही खुरटलेल्या सापडतात. शेंगात दाणे कमी व बारीक भरतात. शेंगा भरणे अवस्थेत रोग आल्यास बियाण्यांना सुद्धा याचा प्रादुर्भाव होते. बियाण्याच्या आवरणाचा रंग बदलून करडा, तपकिरी, काळपट होतो. या रोगाचा प्रसार मावा किडीद्वारे व बियाण्यापासून होतो. हिरवा मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात २५-५० टक्क्यांपर्यंत घट येते.
⭕️पिवळा मोझॅक या रोगामध्ये रोगट झाडाच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळसर दिसून येतो. शेंड्याकडील पाने पिवळी पडून आकाराने लहान होतात. पांढऱ्या माशीद्वारे रोगाचा प्रसार होतो. पिवळा मोझॅक रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात ५-९० टक्क्यांपर्यंत घट येते.
🛡️व्यवस्थापन
👉उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी १५x३० सें.मी. आकाराचे पिवळे चिकट सापळे एकरी किमान ६४ लावावेत.
👉परणीनंतर २५ दिवसांनी निंबोळी अर्क ५% किंवा ॲझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३-५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
👉शिफारशीप्रमाणे संतुलीत खताची मात्रा द्यावी. नत्राचा अतिरीक्त वापर टाळावा.
👉शत व बांधावरील तणे काढून नष्ट करावीत.
👉सरवातीला अत्यल्प प्रमाणात असलेली रोगग्रस्त झाडे दिसताच उपटून टाकावीत.
👉मित्रकीटकांचे संवर्धन (उदा. क्रायसोपा, लेडीबर्ड भुंगा) करावे.
👉उन्हाळी सोयाबीन पीक घेऊ नये.
👉रोग प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी, थायमिथोक्झाम (१२.५%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.५% झेडसी) ०.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.