आंबा नियमित फळे धरण्यासाठी झाडाचे नियोजन.

आंबा


हापूस आंब्यामध्ये वर्षाआड फळे धरण्याचा गुणधर्म दहा वर्षांनंतर प्रकर्षाने दिसून येतो. यासाठी पूर्ण वाढलेल्या (दहा वर्षांवरील) हापूस आंब्याच्या झाडांना दरवर्षी नियमित फळे धरण्यासाठी झाडाच्या विस्ताराचा पूर्व-पश्चिम व दक्षिण-उत्तर व्यास मोजून त्याची सरासरी काढून विस्ताराच्या प्रति मीटर व्यासास पॅक्लोब्युट्राझोल ३ मि.लि. या प्रमाणात मात्रा द्यावी. पावसाची तीव्रता कमी असताना पॅक्लोब्युट्राझोलची आवश्यक मात्रा ३ ते ५ लिटर पाण्यात मिसळून झाडाच्या बुंध्याभोवती विस्ताराच्या निम्म्या अंतरावर १० ते १२ सें.मी. खोल असे सम अंतरावर २५ ते ३० खड्डे मारून त्यात द्रावण समप्रमाणात ओतावे. नंतर खड्डे मातीने बुजवून टाकावे. पॅक्लोब्युट्राझोल देण्यापूर्वी झाडाभोवतीचे तण काढून टाकावे.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


Post a Comment (0)
Previous Post Next Post