भुईमुग पिक व्यवस्थापन तसेच सुर्यफुल पिक नियोजन.

 भुईमुग 


पेरणीनंतर ४५ व ५५ दिवसांनी २०० लिटर पाण्याचा मोकळा पत्र्याचा ड्रम पिकावरून दोनदा फिरवावा. यामुळे सगळ्या आऱ्या जमिनीत घुसतात. त्यांना शेंगा लागतात. पाने खाणारी अळी, पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (२५ ईसी) २ मि.लि. किंवा क्लोरपायरिफॉस (२० ईसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.




फुले उमलण्याच्यावेळी पेरणीपासून ४५ ते ५५ दिवसांनी नॅप्थील ॲसेटीक ॲसीड (एन.ए.ए.) या संजीवकाची २० पी.पी.एम. या प्रमाणात फवारणी करावी. यामुळे दाणे भरण्याचे प्रमाण वाढते, उत्पादनात वाढ होते. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या ०.२ टक्के द्रावणाची (२ ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी पीक फुलोऱ्यात असताना करावी. यामुळे परागकणांची कार्यक्षमता सुधारून परागीभवनास त्याचा फायदा होतो. फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण वाढते.





कृषिक अप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post