नितीन रा.पिसाळ, प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक),
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मानवाला दूध जसे जीवनावश्यक असते तसेच जनावरांसाठी चारा देखील खूप अत्यावश्यक असतो. जनावरांच्या शारीरिक वाढीसाठी, प्रजनन क्षमतेसाठी तसेच दूध उत्पादनासाठी सकस व संतुलित आहाराची गरज असते. त्यामध्ये हिरवा चारा, वाळला चारा, पशुखाद्य, खनिज मिश्रणे यांचा समावेश असतो. दुग्ध व्यवसायात जवळपास ७० टक्के खर्च हा जनावरांच्या खाद्यावरती होत असतो. प्रत्येक शेतकऱ्याकडे सुरुवातीला एक-दोन गाई म्हशी असतात परंतु त्या विल्यानंतर त्यांची संख्या वाढतच जाते. अशा काळात त्यांच्याकडे व्यवस्थापनासाठी लागणारी सर्वच साधनसामग्री उपलब्ध असते असं नाही जसं की कुट्टी मशीन, मिल्किंग मशीन, ट्रॅक्टर ट्रॉली, गव्हाण, पाण्याची टाकी, पुरेसे शेड, चाऱ्यांचे कोठार इ.जनावरांची संख्या कमी असल्यावर हया गोष्टी करणे परवडणारे जरी नसले तरी जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व आहारासाठी काही गोष्टी नाकारता येत नाहीत त्यातीलच एकमेव महत्त्वाची सामग्री म्हणजे कुट्टी मशीन ज्याचे दुग्धव्यवसायात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
संपूर्ण लेख वाचण्यासाठी कृषिक अॅॅप मध्ये वाचा👇🏻👇🏻
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्य़ातील गावनिहाय हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.📱📱