आले
आल्याचे मूल्यवर्धित पदार्थ
आल्याची पावडर - चांगले वाळलेले आले घेऊन त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ही पावडर ५० ते ६० मेशच्या चाळणीमधून चाळून हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरचा मुख्य उपयोग ओलिओरेझिन, तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.
आल्याचे तेल - वाळलेल्या आल्याची पावडर वापरून वाफेच्या ऊर्ध्वपातन क्रियेत आल्याचे तेल गोळा करतात. आल्यापासून १.५ ते ३.५ टक्के तेल मिळते. हे फिकट हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे व विशिष्ट प्रकारचा स्वाद व मसालेदार वासाचे असते.
हळद
सच्छिद्र ड्रमच्या वापराने शिजलेले मातीविरहित हळदकंद मिळतात. आयताकृती कुकरच्या वापराने लवकर हळदकंद शिजविता येतात. त्यामुळे हळदकंज शिजविण्यासाठी या पद्धतींचा अवलंब फायद्याचा राहतो.
सच्छिद्र ड्रमचा वापर - या पद्धतीमध्ये डिझेलच्या ड्रमचा वापर केला जातो. ड्रमच्या पत्र्यापासून ४५ सें.मी. उंचीचे व ६० सें.मी. व्यासाचे चार ते पाच सच्छिद्र ड्रम बनवून त्यांचा वापर केला जातो. हळदकंद २५० सें.मी. व्यासाच्या मोठ्या कायलीमध्ये भरून ठेवतात. मोठ्या कायलीमध्ये पाणी ओतून पाण्याची पातळी ड्रमच्या उंचीच्या वर पाच ते सहा सें.मी. इतकी ठेवली जाते. ड्रम गोणपाटाने झाकले जातात. या पद्धतीमध्ये हळद फक्त २४ ते ३० मिनिटांत चांगली शिजते. प्रत्येकवेळी कायलीतील पाणी सोडण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे एक एकर क्षेत्रावरील हळद दोन दिवसांत शिजून तयार होते. हळद शिजताना हळकुंडावरील माती कायलीत जमा होते, त्यामुळे मातीविरहीत स्वच्छ हळद मिळते.
आयताकृती कुकरचा वापर - ही पद्धत तमिळनाडू कृषी विद्यापीठ, कोईमतूर यांनी विकसित केली आहे. या पद्धतीमध्ये ०.५ x ०.७ x ०.५ मीटर आकाराचे सच्छिद्र ट्रे हळद कंदांनी पूर्णपणे भरता
त. हे ट्रे पाणी भरलेल्या १.२ x ०.९ x ०.७५ मीटर आकाराच्या मोठ्या चौकोनी ट्रेमध्ये ठेवतात. ह्या पद्धतीमध्ये मोठ्या ट्रेमध्ये तीन चतुर्थांश भरलेल्या उकळत्या पाण्यात छोट्या ट्रेमधील हळदकंद शिजतात. त्यामुळे ते सर्व हळदकंद समप्रमाणात शिजले जातात.