आंबा पिकातील फळ गळ नियोजन व डाळिंब पिकातील मृग बहार नियोजन.

 आंबा 

तापमानात वाढ होऊन आर्द्रतेत घट होण्याची शक्यता असल्याने, अशा वातावरणात फळधारणा झालेल्या आंबा बागेमधील वाटाणा ते सुपारी आकाराच्या फळांची गळ होण्याची शक्यता असते. ही फळगळ कमी करण्यासाठी पाण्याच्या उपलब्धतेनुसार १५० ते २०० लिटर पाणी प्रति झाड या प्रमाणात आठवड्याच्या अंतराने फळे सुपारीच्या आकाराच्या अवस्थेपर्यंत द्यावे. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना पहिली तीन वर्षे पाणी देण्याची व्यवस्था करावी. पहिल्या वर्षी आठवड्यातून दोनवेळा, तर दुसऱ्या वर्षी पंधरा दिवसांतून दोनवेळा आणि तिसऱ्या वर्षी महिन्यातून दोनवेळा प्रत्येक कलमास ३० लिटर पाणी देण्याची व्यवस्था करावी.


डाळिंब
डाळिंब
मृग बहार (फळ तोडणीनंतर बागेची विश्रांती अवस्था)
अन्नद्रव्य व्यवस्थापन
प्रत्येक झाडाला शेणखत २० ते २५ किलो किंवा शेणखत १३-१५ किलो अधिक गांडूळखत २ किलो अधिक निंबोळी २ किलो किंवा चांगले कुजलेले कोंबडी खत ७.५ किलो अधिक निंबोळी पेंड २ किलो प्रति झाड द्यावे. 

  • रासायनिक खतामध्ये २०५ ग्रॅम नत्र (४४६ ग्रॅम निमकोटेड युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) आणि १५२ ग्रॅम पालाश (२५४ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा ३०४ ग्रॅम सल्फेट ऑफ पोटॅश) प्रति झाड द्यावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे.
    कीड व्यवस्थापन खोड किड, शॉट होल बोरर, वाळवी, माइट्स, पाने खाणारी अळी व रसशोषक कीटक (पिठ्या ढेकूण, खवले कीड) इत्यादींसाठी नियमित निरीक्षण करावे. किडीच्या प्रादुर्भावानुसार खालीलप्रमाणे
    कीटकनाशकाची फवारणी करावी. 
  • किडीचा कमी प्रादुर्भाव आढळल्यास, कडुनिंब तेल किंवा ॲझाडिरेक्टिन (१०,००० पीपीएम) ३ मि.लि. अधिक स्टिकर स्प्रेडर ०.२५ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारावे. 
  • रसशोषक कीटकांचा प्रादुर्भाव जास्त आढळल्यास, लॅमडा साह्यलोथ्रिन (५ ईसी) ०.६ मि.लि. किंवा सायॲण्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मि.लि. किंवा थायमिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) अधिक स्टिकर स्प्रेडर स्टिकर स्प्रेडर प्रति लिटर पाणी प्रमाणे फवारावे. 
  • शॉट होल बोरर किंवा खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, थायमिथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) १-१.५ ग्रॅम अधिक प्रोपीकोनॅझोल (२५ ईसी) १-२ मि.लि. प्रति लिटर पाणी प्रमाणे आळवणी (ड्रेंचिंग) करावी.

    कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post