- कांदा-लसूण
कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक - फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची फवारणी टाळावी; अन्यथा मधमाश्यांना हानी पोचते.
- अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी.
- मधमाश्यांची संख्या कमी झाल्यास, एकरी एक-दोन मधमाश्यांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
- पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कांदा बीजोत्पादनाचे उभे पीक
- फुले उमलल्यानंतर बुरशीनाशक किंवा कीटकनाशक यांची फवारणी टाळावी; अन्यथा मधमाश्यांना हानी पोचते.
- अत्यंत आवश्यक असेल तरच हाताने खुरपणी करावी. खुरपणी करताना फुलदांड्यांना हानी पोहचणार नाही, याची काळजी घ्यावी.
- मधमाश्यांची संख्या कमी झाल्यास, एकरी एक-दोन मधमाश्यांच्या पेट्या शेतामध्ये कांद्याची फुले उमलल्यानंतर ठेवाव्यात.
- पिकास जमिनीचा मगदूर, तापमान यांचा विचार करून १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
टोमॅटो
जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून घ्यावी. चांगली कुळवणी करून घ्यावी. त्यावेळी ८ टन प्रतिएकरी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे. जमिनीत असलेल्या गवताच्या काड्या, हरळीच्या काश्या, लव्हाळा गाठी चांगल्याप्रकारे वेचून जाळून टाकाव्यात. उत्तम प्रतीच्या भारी जमिनीत ९० ते १२० सें.मी. अंतरावर, तर हलक्या जमिनीत ६० ते ७५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून जमिनीच्या उतारानुसार वाफे बांधून घ्यावेत. लागण करतेवेळी दोन रोपांतील अंतर ४५ ते ६० सें.मी. ठेवावे. ३.६० x ३.०० मी. आकारमानाचे वाफे तयार करावेत.
टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन वाफसा स्थिती ठेवावी. लागवडीच्या दिवशी वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे. वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी. मरगळलेली, इजा झालेली, मुळे कमी असणारी, वाकडे व चपटे खोड असणारी तसेच रोगट रोपे लागवडीसाठी घेऊ नयेत. लागवडीपूर्वी रोपे कार्बोसल्फान १ मि.लि. व कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत. रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये. नाजूक खोड ताबडतोब पिचल्याने अशी रोपे नंतर दगावतात. लागवड केल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आंबवणीचे पाणी द्यावे. लागवडीनंतर १० दिवसांच्या आत जी रोपे मेली असतील, त्या ठिकाणी नवीन रोपांचे नांगे भरून घ्यावेत.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.