रब्बी मका
मक्याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक असते. मका पीक पाण्याच्या ताणास संपूर्ण कालावधीमध्ये संवेदनशील असल्याने पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची शाकीय अवस्था (पेरणीनंतर २० ते ४० दिवस), पीक फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर ४० ते ६० दिवस), दाणे भरण्याच्या वेळेस (पेरणीनंतर ७० ते ८० दिवस) या संवेदनशील अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे, तसेच पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे. म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची आवश्यकता अधिक असते. रब्बी हंगामामध्ये १० ते १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.