कांदा-लसूण
पाणी व्यवस्थापन
पाण्याचे प्रमाण आणि दोन पाळींतील अंतर हे पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीचा मगदूर इत्यादी वर अवलंबून असते.
पिकाला पाणी देताना १५ सें.मी.पेक्षा जास्त खोलवर ओल जाईल, असे पाणी देण्याची गरज नाही.
सुरवातीच्या काळात पिकाला बेताचे पाणी लागते. कोरड्यात लागवड केल्यास पाठोपाठ पाणी द्यावे. कोरडी किंवा ओली लागवड केल्यानंतर दोन दिवसांनी चिंबवणी द्यावी.
खरीप कांद्यास क्वचितच पाणी देण्याची गरज पडते. दोन पावसाच्या पाळ्यात अंतर पडले, तर ठिबक किंवा तुषार सिंचनाद्वारे एक-दोन वेळा पाणी द्यावे.
काढणीपूर्वी दोन आठवडे अगोदर पाणी बंद करावे. त्यामुळे कांदा पोसतो, सड कमी होते, माना जाड होत नाहीत.
रांगडा व रब्बी कांद्याला ऑक्टोबर ते जानेवारीमध्ये ८ ते १२ दिवसांनी आणि फेब्रुवारी ते एप्रिलमध्ये ५ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
खालील बॅनर वर क्लिक करून नोंदणी करा
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.