गहू
खोडमाशीकरिता ढगाळ हवामान पोषक असते. खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास, नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. किंवा क्विनॉलफॉस (२५ इसी) १.५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणात गरजेनुसार १ ते २ फवारण्या कराव्यात.
पिकावर तांबेरा दिसू लागताच, मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. गरजेनुसार दुसरी फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. जास्त पाणी दिल्यास शेतात सतत ओलावा टिकून राहतो. अति ओलाव्यामुळे रोगाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. हे लक्षात घेऊन पिकाच्या गरजेनुसारच पाणी द्यावे. शिफारस केल्याप्रमाणेच रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात वापर केल्यास तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
मावा व तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच, लेकॅनिसिलीयम लेकॅनी किंवा मेटाऱ्हायझीम ॲनीसोप्ली या जैविक कीटकनाशकाची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. जैविक उपाययोजना करूनही कीड नियंत्रित होत नसल्यास, थायमेथोक्झाम (२५ डब्लूजी) ०.१ ग्रॅम किंवा ॲसिटामिप्रिड (२० एसपी) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात १० ते १५ दिवसांच्या अंतराने गरजेनुसार १ ते २ फवारण्या कराव्यात.
कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.