हरभरा पिकातील घाटे अळी व्यवस्थापन.

 हरभरा


✨घाटे अळीच्या प्रादुर्भावाचा आगाऊ अंदाज येण्यासाठी एकरी २ कामगंध सापळे दर ५० मीटर अंतरावर शेतात उभारावेत. दर १५ दिवसांनी त्यातील ल्युर बदलावेत.

\✨घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसताच, निंबोळी अर्क ५ टक्के किंवा ॲझाडिरेक्टीन (३०० पीपीएम) ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. 
✨जिरायती हरभऱ्यामध्ये घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यासाठी एच.ए.एन.पी.व्ही. १ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
✨ज्या ठिकाणी जिरायती हरभऱ्यात मोठ्या अवस्थेतील घाटे अळी आढळून येत असेल, तिथे इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
 ✨जिरायत हरभरा पिकास पाण्याचा ताण पडल्यास युरियाच्या २ टक्के द्रावणाची (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) फवारणी करावी.
 ✨जिरायत हरभरा दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्यास, पिकावर पोटॅशियम नायट्रेटची (१३:००:४५) १० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post