आले व हळद पिक काढणी सल्ला.


 आले

आल्याचा पाला सुकल्यानंतर पाला गोळा करावा. जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलकेसे पाणी देऊन आल्याची टिकाव अथवा कुदळीच्या सहाय्याने खांदणी करावी. आल्याचे गादीवाफे चार फुटांवर असल्यास आल्याची काढणी ट्रॅक्‍टरचलित आले व हळद काढणी यंत्राद्वारे करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणीनंतर आल्याचे गड्डे, बोटे (नवीन आले) वेगळे करावे. काढणी केल्यानंतर कंद त्वरित सावलीत ठेवावेत, अन्यथा वजनामध्ये घट येण्याची शक्‍यता असते. कंद स्वच्छ पाण्यामधून धुऊन मातीपासून वेगळे करून बाजारपेठेमध्ये पाठवावेत.

हळद

लागवडीच्या पद्धतीनुसार हळद काढणीची पद्धत अवलंबवावी. सरी वरंबा पद्धतीत टिकाव अथवा कुदळीच्या सहाय्याने हळदीची खांदणी करावी. तर गादीवाफा पद्धतीत ट्रॅक्‍टरचलीत हळद काढणी यंत्राचा वापर करावा. हळदीची काढणी करतेवेळी जमीन पूर्णपणे वाळली असल्यास हलके पाणी द्यावे. परिणामी हळद काढणी करणे सोपे होते. खांदणी करून काढलेले कंद २-३ दिवस सूर्यप्रकाशात चांगले तापू दिल्यास कंदास चिकटलेली माती पूर्णपणे निघण्यास मदत होते. २-३ दिवसानंतर हळदीच्या कंदाची मोडणी करावी. हळदीच्या कंदाचा गड्डा आपटल्यास हळकुंडे गड्डे एकम��कांपासून वेगळे होतात. त्यावेळी मात्र जेठे गड्डे, बगल गड्डे, हळकुंडे, सोरा गड्डा, कुजकी सडलेली हळकुंडे अशा कच्च्या मालाची प्रतवारी करावी. त्यानुसार त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हळदीची काढणी केल्यानंतर लवकरात लवकर हळदीची प्रक्रिया करावी. काढणी केल्यानंतर साधारणतः १५ दिवसांच्या आत त्यावर प्रक्रिया करावी. म्हणजे हळदीची प्रत व दर्जा चांगला राहतो. जातीपरत्वे सर्वसाधारणपणे एकरी १५० ते २०० क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळते. तर प्रक्रिया करून ३० ते ४० क्विंटल होते.

खालील बॅनर वर क्लिक करून नोंदणी करा

कृषिक अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.



Post a Comment (0)
Previous Post Next Post