हरभरा
तुषार सिंचनाचा वापर
- तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. तसेच जमीन नेहमी भुसभुशीत राहते. तुषार सिंचन पद्धतीमध्ये पाणी दिल्यास शेतामध्ये सारा, पाट, वरंबे पाडण्याची गरज नसते. पर्यायाने यावरील खर्चात बचत होते.
- तुषार सिंचनाने पाणी प्रमाणात देता येत असल्यामुळे मूळकूज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. तुषार सिंचन पद्धतीने जमिनीत नेहमीच वाफसा स्थिती राहत असल्याने पिकास दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वाफसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्ये शोषण्याची क्षमता वाढते.
- पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते.
- हळद तिसऱ्या अवस्थेमधील नियोजन आणि आले पिकातील खत व्यवस्थापन.
रब्बी ज्वारी
अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि तो कमी प्रमाणात असल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावेत. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडीरॅक्टीन (१,५०० पीपीएम) ५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. अमेरिकन लष्करी अळीच्या जैविक नियंत्रणासाठी, मेटारायझियम अॅनिसोप्ली ५ ग्रॅम किंवा नोमुरिया रिलाय ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपेक्षा अधिक असल्यास, नियंत्रणासाठी थायमिथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (९.% झेडसी) ०.५ मिलि किंवा इमामेक्टिन बेन्झोएट (५ एसजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतामध्ये एकरी ५ कामगंध सापळे; तर नर पतंग मोठ्या प्रमाणात आकर्षित करून मारण्यासाठी १५ कामगंध सापळ्यांचा वापर करावा. वेळेवर कोळपणी व खुरपणी करून शेत तणमुक्त ठेवावे.