तूर
पाणी देण्याची सोय उपलब्ध असेल तर फुलकळी लागताना, फुलोऱ्याच्या अवस्थेत आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे किंवा ठिबक सिंचनाने ५० टक्के बाष्पीभवनानंतर पाणी द्यावे. पिकास फुले येण्याच्या अवस्थेत किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास, युरिया किंवा पोटॅशिअम नायट्रेट किंवा डी.ए.पी. २ टक्के (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.
कापूस गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि सोयाबीनची साठवणुक.
कापूस
कपाशीची वेचणी साधारणतः ४० टक्के बोंडे फुटल्यानंतर करावी. पुढील वेचणी जवळपास १५ ते २० दिवसांनी करावी. वेगवेगळ्या जातीचा व वेचणीचा कापूस स्वतंत्र वेचावा व साठवणूक वेगवेगळी करावी. कापूस वेचणी शक्यतो सकाळी करावी. जेणेकरून थंड वातावरणात काडीकचरा कपाशीच्या बोंडासोबत चिकटून येणार नाही. वेचणी करताना फक्त पूर्ण फुटलेली बोंडे वेचावीत. पावसात भिजलेली बोंडे वेगळी वेचावीत. शेवटच्या वेचणीवेळी कवडी कापूस वेचावा.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.