हळद
रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. जमिनीत सतत ओलावा राहिल्याने हळकुंडे कुजतात. त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो. हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. आठ महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकास पाणी देत रहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.
पूर्वहंगामी ऊस आंतरपिकांची निवड आणि आडसाली ऊस ठिबक सिंचन नियोजन.
आले
रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा उपयोग करावा. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. जमिनीत सतत ओलावा राहिल्याने गड्डे कुजतात. त्यामुळे कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव होतो. हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. सात महिने होईपर्यंत जमिनीच्या मगदूराप्रमाणे पिकास पाणी देत रहावे. गड्डे पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.