हळद तिसऱ्या अवस्थेमधील नियोजन आणि आले पिकातील खत व्यवस्थापन.

 हळद

हळदीची साधारणतः चार ते पाच फूट उंची आणि एक फूट घेर या आकारमानामध्ये १२ ते १५ पाने आणि ४ ते ५ फुटवे असल्यास हळदीची वाढ समाधानकारक असल्याचे समजावे. सध्या हळदवाढीच्या दोन अवस्था पूर्ण होऊन हळद तिसऱ्या अवस्थेमध्ये आहे. त्यातील पहिली उगवणीची अवस्था लागवडीपासून दीड महिन्यापर्यंत पूर्ण होते, तर दुसरी शाकीय वाढीची अवस्था ही दीड महिन्यापासून पाच महिन्यांपर्यंत असते. या अवस्थेमध्ये हळदीची उंची, फुटव्यांची संख्या आणि पानांची संख्या निश्‍चित होते. हळदीच्या दुसऱ्या अवस्थेनंतर म्हणजेच लागवडीपासून ५ ते ५.५ महिन्यांनंतर हळदीची उंची वाढत नाही. या टप्प्यात नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. साडेपाच फुटांपेक्षा हळदीची उंची अधिक असल्यास, तज्ञांच्या सल्ल्याने वाढनियंत्रक रसायनांचा वापर करावा. त्यामुळे हळद काडावरती जाण्याचा धोका टळतो. तिसरी अवस्था पाच ते सात महिने या दरम्यान असते. या अवस्थेमध्ये ००-००-५० या पालाशयुक्त विद्राव्य खताचा वापर करावा.



खतांचे व्यवस्थापन करत असताना संतुलित अन्नद्रव्यांचा वापर करावा. नत्रयुक्त खताचा वापर वाढविल्यास पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होण्याचा धोका असतो. आले पिकाची उंची तीन फुटांच्या दरम्यान असावी. फुटव्यांची संख्या वाढविण्यासाठी स्फुरदयुक्त खतांचा वापर करावा. तर पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढविणे आणि गड्ड्यांच्या फुगवणीसाठी माती परीक्षण व शिफारशीप्रमाणे पालाशचा वापर करावा.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post