खोडवा ऊस
ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट व्यवस्थापन असे करावे
- खोडवा ऊस काढून टाकावयाचा असल्यास, शेतातील पाचट पेटवू नये किंवा शेताबाहेर काढू नये.
- खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखे पसरून चांगले वाळू द्यावे, म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.
- पाचट कुट्टी मशिनच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
- पाचट कुजविण्यासाठी पाचटावर एकरी १ पोते युरिया व १ पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर एकरी ४ किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन टाकावे.
- ऊसाच्या बुडख्यांचे व मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी व काढण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.
- साखर कारखान्यातील मळी किंवा मळीचे कंपोस्ट एकरी २.५ टनापर्यंत पाचटावर टाकल्यास पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
- पलटीच्या सहाय्याने पाचट जमिनीत गाडावे (माती आड करावे) आणि आवश्यकता असल्यास शेताला पाणी द्यावे. अशाप्रकारे पाचट दोन ते तीन महिन्यांत चांगल्याप्रकारे कुजवून जमिनीची सुपिकता वाढविता येते.
आडसाली ऊस तांबेरा रोगाचे नियंत्रण व खोडवा उसाला पहारीच्या साह्याने खत देणे.
पूर्वहंगामी ऊसउसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत.
पूर्वहंगामी ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) १ ते ४ आठवडे – युरिया ९ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एमओपी २.२५ किलो. ५ ते ९ आठवडे – युरिया १६.५० किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एमओपी २.७५ किलो. १० ते २० आठवडे – युरिया १०.७५ किलो, १२:६१:०० ४.५० किलो, एमओपी ३ किलो. २१ ते २६ आठवडे – एमओपी ६ किलो.