लसूण पिक सल्ला तसेच कोबी पिकातील खत व्यवस्थापण.

 कांदा-लसूण

लसणाचे उभे पीक 


  • लागवडीनंतर नत्र खताचा पहिला हप्ता १० किलो प्रतिएकर या प्रमाणात ३० दिवसांनी, तर दुसरा हप्ता याच प्रमाणात ४५ दिवसांनी द्यावा.
  • लागवडीनंतर ४० ते ६० दिवसांनी खुरपणी करावी. 
    लागवडीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण (ग्रेड-२) ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
  • फुलकिडे आणि करपा नियंत्रणासाठी, (फवारणी प्रति लिटर पाणी) पहिली फवारणी - कार्बोसल्फान २ मि.लि. अधिक ट्रायसायक्लॅझोल १ ग्रॅम दुसरी फवारणी - पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनंतर, फिप्रोनील १ मि.लि. अधिक मॅन्कोझेब २ ग्रॅम तिसरी फवारणी - दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांनंतर, प्रोफेनोफॉस १ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल १ मि.लि. 
  • पांढऱ्या लांबट कोळींचा प्रादुर्भाव आढळल्यास, सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम किंवा डायकोफॉल (१८.५ इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

खरीप कांदा पिक रोग व किडी नियोजन तसेच टोमॅटो एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन.


कोबी वर्गीय पिके
जस्त कमतरतेसाठी लागवडीच्या वेळी एकरी ८ किलो झिंक सल्फेट; तर लोह कमतरतेसाठी एकरी १० किलो फेरस सल्फेट शेणखताबरोबर किंवा निंबोळी पेंडीसोबत द्यावे. फवारणीद्वारे द्यावयाची अन्नद्रव्ये देताना, चिलेटेड जस्त किंवा चिलेटेड लोह १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे मिसळून लागवडीनंतर ३० दिवसानंतर आठ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post