पशु संवर्धन | भारतीय गोवंश बद्द्ल माहिती |

 पशु संवर्धन:- 


भारतीय गोवंशामध्ये बदलत्या वातावरणामध्ये तग धरण्याची आणि दूध देण्याची क्षमता आहे. भारतीय बाजारपेठेत देशी गाईच्या दुधाची मागणी वाढत आहे. त्यामुळे जातिवंत दुधाळ गाईची निवड, पैदास धोरण आणि योग्य व्यवस्थापनावर भर देणे गरजेचे आहे. देशामध्ये एकूण गोवंशापैकी ७६ टक्के गोवंश हा गावठी आहे. फक्त २४ टक्के गाई शुद्ध जातीच्या राहिल्या आहेत. त्यामुळे देशी गोपालन करताना शुद्ध जातीची निवड महत्त्वाची ठरते. भारतात सहिवाल (पंजाब, हरियाणा), लाल सिंधी (सिंध प्रांत), थारपारकर (कच्छ), गीर, कांक्रेज (गुजरात), हरियाणवी (हरियाणा), राठी (राजस्थान) या दुधाळ जाती आहेत. महाराष्ट्रात खिल्लार, लाल कंधारी, देवणी, गवळाऊ, डांगी, कोकण कपिला हे गोवंश आहेत. बऱ्याच जातींमध्ये उपजातीसुद्धा आढळून येतात. महाराष्ट्रातील देशी गोवंशाचे दुग्धोत्पादन फारसे नाही. कारण दुधाच्या वाढीपेक्षा काम करणाऱ्या बैलांची पैदास करण्याकडेच जास्त कल राहिला आहे. या जातींचे योग्य संवर्धन केल्यास, जातीवंत दुधाळ गोवंश तयार करणे निश्चितच शक्य आहे. आपल्याकडील देशी गाईंच्या जातीत एका वेतात अधिक दुग्धोत्पादन क्षमता असणारे देशी गोवंश म्हणजे सहिवाल, गीर, लाल सिंधी आणि थारपारकर असा क्रम लागतो. उत्तम जातीची पैदास हा खात्रीच्या आनुवंशिक गुणांचा ठेवा आहे. एकूण गोपालनात हा ठेवा ४० टक्के गुणवत्ता आणि उरलेले ६० टक्के हा दैनंदिन देखभाल, खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनावर अवलंबून आहे.

           कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.                                                                 




Post a Comment (0)
Previous Post Next Post