कुक्कुट पालन:-
वातावरणात सदैव विषाणू, जिवाणूचे अस्तित्व असते. पोषक वातावरण मिळाल्यास त्यांचा प्रादुर्भाव सुरू होतो. कोंबड्यांमध्ये निरनिराळ्या वयोगटांत निरनिराळ्या संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोगप्रतिबंधक लसीकरण करणे फायद्याचे असते.
कोंबड्यांमधील लसीकरणाचे वेळापत्रक - रोगाचे नाव - लसीचे नाव - वय मरेक्स - मरेक्स लस - पहिला दिवस रानीखेत (मानमोडी) - लासोटा - ५ ते १० दिवस गंबोरो (IBD) - गंबोरो – ७ व्या, १८ व्या दिवशी ,२५ व्या ते ३० व्या दिवशी फाऊलपॉक्स (देवी) - फाऊलपॉक्स - ६ ते ८ आठवडे रानीखेत (मानमोडी) - रानीखेत (आर २ वी) – ८ ते १० वा आठवडा व १६ ते १८ वा आठवडा