आले
शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर आल्याला फुले येण्यास सुरवात होते. त्यास ‘हुरडे बांड’ असे म्हणतात. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या पानांची वाढ थांबून गड्ड्यांची वाढ होण्यास सुरवात होते. आल्याची फुले तशीच झाडावर ठेवल्यास कोणताही तोटा होत नाही. परंतु, फुले कापून काढल्यास त्यांच्या देठाच्या कापलेल्या भागातून दुय्यम बुरशींचा पिकात शिरकाव होतो. परिणामी कंदकूज रोग लागण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून आले पिकामध्ये फुले काढण्याचे टाळावे.
हळद कंदकूज,करपा व आले पानांवरील ठिपके, कंदकूज रोग नियंत्रण.
हळद
शाकीय वाढ पूर्ण झाल्यांनतर हळदीला फुले येण्यास सुरवात होते. काही जातींना मोठया प्रमाणात, तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे हळदीच्या शाकीय वाढीचा कालावधी संपून हळदीस कंद सुटण्यास सुरवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. फुलांचे दांडे काढणे ही प्रक्रिया खर्चिक आहे. संशोधनानुसार असे निदर्शनास आले आहे की, हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणत्याही प्रकारे घट झालेली नाही. फुलांचे दांडे ही न संपणारी प्रक्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले तरी ते नव्याने येत राहतात. फुले काढताना खोडाला इजा झाली, तर त्या भागातून बुरशींचा पिकात शिरकाव होऊन कंदकूज रोग होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हळदीला आलेली फुले तशीच राहू द्यावीत.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.