डाळिंब
हस्त बहर कीड व्यवस्थापन –
पहिल्या सिंचनानंतर – निळे किंवा पिवळे चिकट सापळे १५ ते ३० प्रति एकरी याप्रमाणे झाडाच्या उंचीच्या १० ते १५ सेंमी खाली बांधावेत. ते कीटकांद्वारे सापळ्याच्या व्यापलेल्या पृष्ठभागाच्या आधारे किंवा २०-२५ दिवसांचा अंतराने बदलत राहावे.
कोवळी फूट वाढीची अवस्था (फवारणी प्रतिलिटर पाणी) – कडूनिंब तेल १ टक्के किंवा अॅझाडिरेक्टिन (१०,००० पी.पी.एम.) ३ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि किंवा करंज बियांचे तेल ३ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि
फूल कळी / फुलधारणा अवस्था (फवारणी प्रतिलिटर पाणी) – पहिल्या फवारणीनंतर ७ ते १० दिवसांनी दुसरी फवारणी करावी. सायअॅन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ ओडी) १.८ मिलि किंवा क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि किंवा फ्लुबेन्डीअमाइड (१९.९२ w/w) अधिक थायक्लोप्रिड (१९.९२ w/w) (संयुक्त कीटकनाशक) ०.५ मिलि अधिक स्प्रेडर स्टिकर ०.२५ मिलि
प्रिव्हेटीव्ह (एल) आयुर्वेदिक पावडर ओर्डर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे
संत्रा-मोसंबी-लिंबू
लिंबूवर्गीय फळबागेमध्ये ठिबक सिंचन संच असल्यास त्याच्या नळ्या पसरून घ्याव्यात. ठिबक सिंचन पद्धतीमध्ये झाडांना पाणी देण्यासाठी तोट्या (ड्रीपर) किंवा सूक्ष्मनलिका (मायक्रोट्यूब) वापरल्या जातात. या तोट्या दाबनियमक वापरल्यास शेतीमध्ये पाणी सर्वदूर सम प्रमाणात दिले जाते. या पद्धतीमध्ये पाण्याचा दाब आपोआप सर्वदूर ९० ते ९५ टक्के सारखा पसरला जातो. ठिंबक सिंचनाची सुविधा नसल्यास, दुहेरी रींग पद्धतीने सिंचनासाठी आळे करावे. जमिनीची मशागत आणि निंदणी करावी.
संत्रा व मोसंबी बागेसाठी पाण्याचे प्रमाण झाडाचे वय प्रतिझाड प्रतिदिन पाणी १ वर्ष ९ लिटर ४ वर्षे ४० लिटर ८ वर्षे १०५ लिटर १० वर्षे व अधिक १३१
लिंबू बागेसाठी पाण्याचे प्रमाण १ वर्ष ६ लिटर ४ वर्षे १९ लिटर ८ वर्षे ५७ लिटर १० वर्षे व अधिक ९२ लिटर