️लसूण खत व्यवस्थापन आणि वेल वर्गीय पिके कीड नियंत्रण.


कांदा-लसूण
 


️लसूण खत व्यवस्थापन - वाफे तयार करण्यापूर्वी एकरी ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा ३ टन कोंबडी खत/ गांडूळ खत पसरून जमिनीत चांगले मिसळावे. रासायनिक खतमात्रा एकरी नत्र ३० किलो, स्फुरद २० किलो, पालाश २० किलो द्यावे. यापैकी लागवडीवेळी १० किलो नत्र आणि स्फुरद, पालाशच्या संपूर्ण मात्रा द्याव्यात. उर्वरीत नत्रमात्रा दोन समान हप्त्यात विभागून ३० आणि ४५ दिवसांनी द्याव्यात. नत्राची मात्रा लागवडीनंतर ६० दिवसांनी देऊ नये. त्यामुळे उत्पादन व साठवणीवर विपरीत परिणाम होतो. कांदा व लसूण ही पिके गंधकयुक्त खतास चांगला प्रतिसाद देतात. भरखते देताना अमोनियम सल्फेट व सिंगल सुपर फॉस्फेट यांसारख्या खतांचा उपयोग केल्यास आवश्यक गंधकाची मात्रा पिकास मिळते. मिश्रखते वापरल्यामुळे आवश्यक गंधकाची पूर्तता होत नसल्याने लागवड करण्यापूर्वी प्रति एकरी २० किलो गंधक जमिनीत मिसळावे. शेणखताच्या कमी वापरामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते. यासाठी आवश्यक असल्यास झिंक सल्फेट, मँगेनीज सल्फेट, कॉपर सल्फेट, फेरस सल्फेट यांची फवारणी ०.५ टक्के या प्रमाणात करावी.


आले व हळद कंदमाशी,खोड पोखरणारी अळी,पाने गुंडाळणारी अळी,हुमणी व सूत्रकृमी नियंत्रण.


वेल वर्गीय पिके
कीड नियंत्रण फुलकिडे, मावा व पांढरी माशी - या किडी पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पाने वाकडी होतात. तसेच त्यांच्यामुळे विविध विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो. 

नियंत्रण - थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान (२५ ई.सी.) १.५ मिली प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. नागअळी - ही पानांच्या आत राहून आतील हरितद्रव्याचा भाग खाते. पानांवर नागमोडी रेषा तयार होतात. 
नियंत्रण - ॲझाडिरेक्टीन (१०,००० पीपीएम) ३ मिलि किंवा इथिऑन अधिक सायपरमेथ्रीन (संयुक्त किटकनाशक) २ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. फळमाशी - ही फळांच्या वरील पापुद्र्यात अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळात राहून गर खातात. त्यामुळे फळे सडतात, वेडीवाकडी होतात आणि अकाली पक्व होतात. 
नियंत्रण – क्यू ल्युरचे एकरी ५ सापळे लावावेत. मॅलॅथिऑन (५० ईसी) २ मिलि अधिक गूळ १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात नॅपसॅक पंपाने फवारणी करावी.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
kr

Post a Comment (0)
Previous Post Next Post