पशु संवर्धन :-
पशुधनामध्ये कोणत्याही आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लागणाऱ्या खर्चाच्या पटीत लसीकरणाचा खर्च नगण्य आहे. लसीकरणासाठी लागणारा वेळ आणि पैसा तुलनेने अतिशय कमी असल्याने, त्यापासून होणारा फायदा लक्षात घेता जनावरांना होणाऱ्या रोगांची लस त्या-त्या ऋतूच्या आधी तज्ञ पशुवैद्यकामार्फत करून घेणे फायदेशीर ठरते.
गाई-म्हशींमधील लसीकरणाचे वेळापत्रक - लाळखुरकुत : फेब्रुवारी-मार्च, ऑगस्ट-सप्टेंबर; वर्षातून २ वेळा घटसर्प :
मे-जून (मॉन्सूनपूर्व) फऱ्या : एप्रिल (मॉन्सूनपूर्व) आंत्रविषार : एप्रिल-मे (मॉन्सूनपूर्व) बुस्टर मात्रा १५ दिवसांनी, फक्त
रोगप्रवण क्षेत्रात अँथ्रॅक्स : एप्रिल (शक्यतो मॉन्सूनपूर्व), फक्त रोगप्रवण क्षेत्रात सांसर्गिक गर्भपात : वयाच्या चौथ्या महिन्यात फक्त कालवडीमध्ये