हरभरा
सुधारीत वाण : कालावधी (दिवस) : उत्पादन (क्विं/हे.) : वैशिष्टये
फुले विक्रम : जिरायती ९५-१००, बागायती १०५-११० : जिरायती १६, बागायती २२, उशिरा पेरणी २१ : यांत्रिक पद्धतीने काढणीस उपयुक्त, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य
विजय : जिरायती ८५-९०, बागायती १०५-११० : जिरायती १४, बागायती २३ : अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम
विशाल : १००-११५ : जिरायती १३, बागायती २० : आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादनक्षमता, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
दिग्विजय : जिरायती ९०-९५, बागायती १०५-११० : जिरायती १४, बागायती २३ : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायती, बागायती तसेच उशिरा पेरणीस योग्य
विराट : ११०-११५ : जिरायती ११, बागायती १९ : काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव
कृपा : १०५-११० : बागायती १८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव
पीकेव्हीके-२ : ११०-११५ : बागायती १६-१८ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
पीकेव्हीके-४ : १०५-११० : बागायती १२-१५ : जास्त टपोऱ्या दाण्यांचा काबुली वाण
बीडीएनजी-७९७ : १०५-११० : जिरायती १४-१५, बागायती ३०-३२ : मध्यम दाणे, मराठवाडा विभागासाठी प्रसारित
साकी-९५१६ : १०५-११० : बागायती १८-२० : मध्यम दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायती तसेच बागायती पेरणीस योग्य
जाकी-९२१८ : १०५-११० : बागायती १८-२० : पिवळसर तांबूस टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायती तसेच बागायती पेरणीस योग्य.
️लसूण खत व्यवस्थापन आणि वेल वर्गीय पिके कीड नियंत्रण.
गहू
सुधारीत वाण
फुले समाधान: बागायती वेळेवर आणि बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, तांबेरा रोगप्रतिकारक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता वेळेवर पेरणी ४५-५०, उशिरा पेरणी ४२-४५ क्विं/हे.
तपोवन: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम परंतु ओंब्यांची संख्या जास्त, प्रथिने १२.५%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.
त्र्यंबक: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्त�� सरबती वाण, दाणे टपोरे आणि आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४०-४५ क्विं/हे.
गोदावरी: बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडई यांसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता ४५-५० क्विं/हे.
निफाड ३४: बागायती उशीरा पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम आणि आकर्षक, प्रथिने १३%, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, १०५-११० दिवसात कापणीस तयार, उत्पादनक्षमता ३५-४० क्विं/हे.
नेत्रावती: जिरायती आणि मर्यादित सिंचनाखाली पेरणीसाठी उत्तम सरबती वाण, दाणे मध्यम व आकर्षक, प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगप्रतिकारक, चपातीसाठी उत्तम, ११०-११५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता जिरायती १८-२०, मर्यादित सिंचनाखाली २७-३० क्विं/हे.
पंचवटी: जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण, दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक, प्रथिने १२%, तांबेरा रोगप्रतिकारक, रवा, शेवया, कुरडई यांसाठी उत्तम, १०५ दिवसांत कापणीस तयार, उत्पादनक्षमता १२-१५ क्विं/हे.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.