सुरु ऊस व्यवस्थापन,पूर्वहंगामी ऊस लागवड पद्धती,आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देणे.


 सुरु ऊस


जमिनीत पावसाचे पाणी साचून राहिले असल्यास चर खोदून पाणी बाहेर काढावे. जर ऊस पडलेला किंवा कललेला असेल, तर दोन ओळींतील ऊस एकमेकांना बांधून आधार द्यावा. सरीतील पाणी ओसरताच ऊस पिकास २० किलो युरिया व २० किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति एकर या प्रमाणे बुस्टर डोस द्यावा. ठिबक सिंचनाची सोय असेल, तर विद्राव्य खतांचा वापर करावा. वाफसा येताच उसाच्या बुडख्यास मातीची भर लावावी.




पूर्वहंगामी ऊस
लागवड पद्धती 
लांब सरी पद्धत - जमिनीच्या उतारानुसार ४० ते ६० मीटरपर्यंत सरीची लांबी ठेवावी. जमिनीच्या प्रकारानुसार सरीमधील अंतर ठेवावे. पाणी देताना २ ते ३ सऱ्यांना एकत्र पाणी दयावे. जमिनीचा उतार ०.३ ते ०.४ टक्क्यांपर्यंत असल्यास, उताराच्या दिशेने सरी काढावी आणि उतार ०.४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास, उताराला आडव्या सऱ्या पाडून ऊस लागवड करावी. सलग पद्धतीमध्येसुद्धा ठिबक सिंचनाचा वापर करावा. टंचाईच्या काळात सरी आड सरी पाणी देणे या पद्धतीत फायदेशीर ठरते. या पध्दतीमध्ये आवश्‍यकतेइतकेच पाणी देता येते. पिकाची वाढ जोमदार होते. लांब सरीमुळे जास्तीत जास्त क्षेत्राचा वापर होतो. उत्पादनात वाढ होते. आंतरमशागत सुलभतेने करता येते.
पट्टा पद्धत (२.५-५ किंवा ३-६ फूट) - जमिनीच्या प्रकारानुसार पट्टा पद्धतीने लागवड करावी. मध्यम जमिनीत २.५ फूट व भारी जमिनीत ३ फूट अंतरावर रिझरच्या सहाय्याने सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांमध्ये लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. म्हणजे दोन जोडओळींत ५ किंवा ६ फूट पट्टा रिकामा राहील. ठिबक सिंचनासाठी आणि अधिक उत्पादनासाठी ही पध्दत फायदेशीर आहे. या पध्दतीत भरपूर सूर्यप्रकाश व हवा मिळाल्यामुळे उसाची वाढ जोमदार होते. यांत्रिकीकरणासाठी ही पध्दत योग्य आहे. यंत्राच्या सहाय्याने ऊसतोडणी करता येते. पट्ट्यामुळे पीक संरक्षण चांगल्याप्रकारे करता येते. ऊस बांधणीनंतर दोन ओळींमध्ये एक सरी तयार होते. त्या सरीला पाणी देऊन उसाच्या दोन्ही ओळी भिजविता येतात. त्यामुळे पाण्याची ४५ टक्‍के बचत होते.



पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी बेणे निवड व आडसाली ऊस सल्ला.


आडसाली ऊस
उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत.
आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) १ ते ४ आठवडे - युरिया १०.५ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एम.ओ.पी. २.२५ किलो. ५ ते ९ आठवडे - युरिया १९.५ किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एम.ओ.पी. २.७५ किलो. १० ते २० आठवडे - युरिया १२.५ किलो, १२:६१:०० ४.५ किलो, एम.ओ.पी. ३ किलो. २१ ते २६ आठवडे – एम.ओ.पी. ६ किलो.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
kr

Post a Comment (0)
Previous Post Next Post