कीड नियंत्रण
कंदमाशी - शेतात उघडे पडलेले गड्डे मातीने झाकून द्यावेत. आल्याची वेळेवर भरणी करावी. कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच, फोरेट (१० सीजी) प्रति एकरी आठ किलो या प्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती पसरावे. किंवा क्लोरपायरीफॉस (५० इसी) ४ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी.
खोड पोखरणारी अळी - प्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत. एक महिन्याच्या अंतराने मॅलेथिऑन १ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. प्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये आकर्षित होणारे प्रौढ कीटक नष्ट करावेत.
पाने गुंडाळणारी अळी - गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावेत. क्विनॉलफॉस (२५ एएफ) २ मिलि किंवा डायमिथोएट (३० इसी) १.५ मिलि प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
सूत्रकृमी - ट्रायकोडर्मा प्लस २.५ ते ३ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे. फोरेट (१० सीजी) दाणेदार एकरी आठ किलो या प्रमाणात जमिनीत टाकावे. अथवा भरणी करताना निंबोळी पेंड ८ क्विंटल प्रति एकरी जमिनीत मिसळून द्यावी. आले पिकात सूत्रकृमींकरिता झेंडू हे सापळा पीक म्हणून लावावे.
हुमणी - जैविक नियंत्रणासाठी, मेटॅरायझियम ॲनासोप्ली ही परोपजीवी बुरशी एकरी २ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी. हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास, क्लोरपायरीफॉस (५० इसी) ४ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.
आले व हळद अधिक उत्पादनवाढ व जमिनीची सुपीकता कशी करावी.
हळद
कीड नियंत्रण
कंदमाशी - उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत. वेळेवर हळदीची भरणी करावी. कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसताच, फोरेट (१० सीजी) दाणेदार एकरी आठ किलो या प्रमाणात जमिनीत मिसळून द्यावे. किंवा क्लोरपायरीफॉस (५० इसी) ४ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणात घेऊन आळवणी करावी.
खोड पोखरणारी अळी - प्रादुर्भावित झाडे नष्ट करावीत. निंबोळी तेल ५ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. गरजेनुसार १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. प्रकाश सापळ्याचा एकरी एक या प्रमाणात वापर करावा. सापळा रात्री ७ ते १० या वेळेत चालू ठेवावा. यामध्ये आकर्षित होणारे प्रौढ कीटक नष्ट करावेत.
पाने गुंडाळणारी अळी व पाने खाणारी अळी - गुंडाळलेली पाने, अळी व कोष वेचून नष्ट करावेत. डायमेथोएट (३० इसी) १.५ मिलि प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
सूत्रकृमी - ट्रायकोडर्मा प्लस २.५ ते ३ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे. फोरेट (१० सीजी) दाणेदार एकरी आठ किलो या प्रमाणात जमिनीत टाकावे. अथवा भरणी करताना निंबोळी पेंड ८ क्विंटल प्रति एकरी जमिनीत मिसळून द्यावी. हळद पिकात सूत्रकृमींकरिता झेंडू हे सापळा पीक म्हणून लावावे.
हुमणी - जैविक नियंत्रणासाठी, मेटॅरायझियम ॲनासोप्ली ही परोपजीवी बुरशी एकरी २ किलो या प्रमाणात शेणखतात मिसळून वापरावी. हुमणीचा प्रादुर्भाव आढळल्यास, क्लोरपायरीफॉस (५० इसी) ४ मिलि प्रतिलिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावी.