डाळिंब ड्रेचिंग पद्धत आणि केळी करपा रोग,विषाणूजन्य रोग,फुलकीड व्यवस्थापण.

 डाळिंब 

बुरशीजन्य मर रोग नियंत्रण फळ तोडणीनंतर ताणावर असताना किंवा पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आळवणीला (ड्रेचिंग) प्राधान्य द्यावे. खालीलपैकी कोणतीही एक पद्धत वापरावी.

 ◆ड्रेचिंग पद्धत १ प्रोपिकोनॅझोल (२५ इसी) २ मिलि अधिक क्लोरपायरीफॉस (२० इसी) २ मिलि प्रति लिटर पाणी. पहिल्या ड्रेचिंगच्या ३० दिवसानंतर, अ‍ॅस्परजिलस नायजर ए.एन. २७ बुरशी ५ ग्रॅम अधिक शेणखत २ किलो प्रति झाड. त्यानंतर ३० दिवसांनी, व्हीएएम बुरशी (वेसिक्युलर आर्बस्क्युलर मायकोरायझा - राइझोफॅगस इररेगुलरिस) २५ ग्रॅम आणि शेणखत २ किलो प्रति झाड.

◆ड्रेचिंग पद्धत २ प्रोपिकोनॅझोल (२५ इसी) २ मिलि अधिक क्लोरपायरीफॉस (२० इसी) २ मिलि प्रति लिटर पाणी. २० दिवसांच्या अंतराने ३ ड्रेचिंग कराव्यात.

◆ड्रेचिंग पद्धत ३ फोसेटिल ए.एल. (८० डब्ल्यूपी) ६ ग्रॅम प्रति झाड (१० लिटर द्रावण वापरावे.) टेब्यूकोनॅझोल (२५.९ w/w ईसी) ३ मिलि प्रति झाड (१० लिटर द्रावण वापरावे.) फोसेटिल ए एल (८०%) ६ ग्रॅम प्रति झाड (१० लिटर द्रावण वापरावे.) टेब्यूकोनॅझोल (२५.९ इसी) ३ मिलि प्रति झाड (१० लिटर द्रावण वापरावे.) *२० दिवसांच्या अंतराने ड्रेचिंग घ्यावे.

केळी

✨पीक संरक्षण 


करपा रोग - रोगग्रस्त पानाचा भाग किंवा पूर्ण पाने कापून बागेबाहेर नेऊन नष्ट करावीत. नियंत्रणासाठी, मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा प्रोपीकोनॅझोल १ मिलि अधिक स्टीकर १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

विषाणूजन्य रोग - कुकुंबर मोझॅक व पर्णगुच्छ रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत. दर चार दिवसांनी बागेचे निरीक्षण करून रोगग्रस्त झाडे आढळल्यास नष्ट करावीत. बागेभोवती उगवलेली रानटी कारली, गुळवेल, दोडके, काकडी इत्यादी वेलवर्गीय झाडे नष्ट करावीत. मावा किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० ईसी) २ मिलि किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

फुलकीड - ॲसिटामिप्रीड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम अधिक स्टिकर १ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे शेवटचे पान निघाल्यावर किंवा केळफूल बाहेर पडतेवेळी पहिली आणि संपूर्ण घड निसवल्यावर दुसरी फवारणी करावी.

कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post