आले
▪सूत्रकृमी - सूत्रकृमी मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात. यांनी केलेल्या छिद्रातून कंदकुजीस कारणीभूत असलेल्या बुरशींचा सहज प्रादुर्भाव होतो. उपाययोजना - ट्रायकोडर्मा प्लस (जैविक बुरशीनाशक) २.५ ते ३ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे. भरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी. आले पिकात झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी. पुढील वर्षी लागवडीपूर्वी प्रादुर्भावग्रस्त जमिनीची खोल नांगरट करावी आणि जमीन किमान ३० दिवसांपर्यंत कडक ऊन्हात तापू द्यावी.
हळद
पीक संरक्षण
▪सूत्रकृमी - सूत्रकृमी पिकाच्या मुळांवर गाठी तयार करतात. जमिनीत मुळांभोवती राहून मुळातील रस शोषून घेतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, फुटव्यांचे प्रमाण कमी होते. सुरवातीला पिकाचा शेंडा मलून होतो. पीक पिवळे पडून झाड मरते. कालांतराने कीड कंदामध्ये प्रवेश करून कंद सडविते. सडलेले कंद तपकिरी रंगाचे दिसतात. किडीने केलेल्या जखमांतून रोगकारक बुरशी कंदात शिरते. त्यामुळे कंदकूज होते.
उपाययोजना – ट्रायकोडर्मा प्लस (जैविक बुरशीनाशक) २.५ ते ३ किलो प्रति एकरी २०० ते २५० किलो शेणखतामध्ये मिसळून वापरावे. भरणी करतेवेळी एकरी ८ क्विंटल निंबोळी पेंड वापरावी. हळद पिकात झेंडूची सापळा पीक म्हणून लागवड करावी. पुढील वर्षी लागवडीपूर्वी प्रादुर्भावग्रस्त जमिनीची खोल नांगरट करावी आणि जमीन किमान ३० दिवसांपर्यंत कडक ऊन्हात तापू द्यावी.
कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.