कपाशीवरील लष्करीअळी नियंत्रण आणि कसे सोयाबीनच्या शेंगाचे आकार व वजन वाढवावे.

कापूस


मक्याशेजारी लागवड असलेल्या कपाशीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. अशा ठिकाणी खालीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात :

 👉मका पिकाच्या अवशेषांमधील अळ्यांचे कपाशी व अन्य पिकांवर होणारे संक्रमण रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी मका पीक काढणीनंतर रोटावेटरच्या साह्याने अवशेषांचे बारीक तुकडे वा भुगा करावा.
 👉रोटावेटर वापरण्यापूर्वी शेतातील पीक अवशेषांवर मेटारायझीयम अनिसोप्ली किंवा नोमुरिया रिलायी ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
 👉मका पिकाचे अवशेष शेतात तसेच उभे किंवा बांधावर साठवून ठेऊ नयेत.
 👉कपाशीची प्रादुर्भाग्रस्त फुले व बोंडे वेचून अळ्यांसहित नष्ट करावेत. जेणेकरून अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल.
 👉पुढील नुकसान टाळण्यासाठी प्रादुर्भावग्रस्त कपाशीवर स्पिनेटोरम (११.७ एससी) ०.८ मिलि किंवा क्लोरॲंट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. 
👉त्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने मेटारायझीयम अनिसोप्ली किंवा नोमुरिया रिलाई ५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. 
👉सध्या वाढीच्या अवस्थेतील अळ्या लवकरच कोषावस्थेत जाऊन त्यातून बाहेर निघणारे पतंग पुन्हा अंडी घालण्यास सुरवात होईल. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पतंगांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी एकरी दोन याप्रमाणे कामगंध सापळे उभारावेत. सापळ्यांमध्ये पतंग अडकण्यास सुरवात झाल्याच्या २-३ दिवसांनंतर शेतामध्ये पानांच्या खालील बाजूने लष्करी अळीचे अंडीपूंज दिसण्यास सुरवात होते. त्या अनुषंगाने वेळेत नियंत्रणाचे उपाय अवलंबवावेत.
 👉पानांच्या खालील बाजूने असणारे लष्करी अळीचे अंडीपूंज व अंड्यांतून नुकत्याच बाहेर पडलेल्या सुरवातीच्या अवस्थेतील समूहाने राहणाऱ्या अळ्या शोधून त्वरीत नष्ट कराव्यात.


सोयाबीन



शेंगा भरत असताना आकार व वजन वाढण्यासाठी, सल्फेट ऑफ पोटॅश (००-००-५०) ५ ग्रॅम अधिक मल्टी मायक्रोन्यूट्रीएंट ग्रेड-२ ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.


   कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


           

Post a Comment (0)
Previous Post Next Post