पूर्वहंगामी ऊस लागवड सल्ला आणि आडसाली ऊस ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापण.

 पूर्वहंगामी ऊस


उसासाठी मध्यम ते भारी मगदुराची व उत्तम निचऱ्याची जमीन असावी. जमिनीची खोली ६० ते १२० सें.मी. असावी. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण किमान ०.५ टक्‍के असावे. भारी जमिनीतील १ ते २ फूट खोल जमिनीचा कठीण थर फोडण्यासाठी दर तीन वर्षांतून एकदा सबसॉयलरचा वापर करावा. जमीन सपाट केल्यानंतर रिजरच्या सहाय्याने भारी जमिनीत १२० ते १५० सें.मी. व मध्यम जमिनीत १०० ते १२० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. पट्‌टा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास मध्यम जमिनीसाठी २.५ फूट व भारी जमिनीसाठी ३ फुटांच्या सलग सऱ्या पाडाव्यात. दोन सऱ्यांमध्ये ऊस लागवड करून एक सरी रिकामी सोडून पुन्हा दोन ओळी ऊस लागवड अशा पद्धतीने जोड ओळ उसाची लागवड करावी. रिकाम्या ओळीत आंतरपिकांची लागावड करावी. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. यांत्रिक पद्धतीने मशागत करण्यासाठी दोन सरीतील अंतर १५० सें.मी. (पाच फुटांपर्यंत) ठेवावे. आंतरमशागतीसाठी लहान ट्रॅक्‍टरचा वापर करावा.

आडसाली ऊस

ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ५ ते ९ आठवड्यांपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेमध्ये युरिया १९.५ किलो, मोनो अमोनियम फॉस्फेट (१२-६१-००) ६.२५ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश २.७५ किलो प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावे. १० ते २० आठवड्यांपर्यंतच्या वाढीच्या अवस्थेमध्ये युरिया १२.५ किलो, मोनो अमोनियम फॉस्फेट (१२-६१-००) ४.५ किलो व म्युरेट ऑफ पोटॅश ३ किलो प्रति आठवडा प्रति एकर या प्रमाणात ठिबक सिंचन प्रणालीमधून द्यावे.


                       कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.





Post a Comment (0)
Previous Post Next Post