सुरु ऊस तपकिरी ठिपके उपाययोजना आणि आडसाली ऊस पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर.

 सुरु ऊस

तपकिरी ठिपके - जास्त पावसाच्या भागात प्रादुर्भाव होतो. रोगाचा प्रादुर्भाव हा रोपांपेक्षा ७-८ महिने वयाच्या पिकावर होतो. जुन्या पानाच्या दोन्ही बाजूंवर अंडाकृती, लालसर ते तपकिरी ठिपके दिसतात. ठिपक्‍यांभोवती पिवळसर वलय दिसते. प्रादुर्भाव वाढल्यास पानांवरील ठिपके एकमेकांत मिसळून मोठे होतात. ठिपक्‍यांमधील पेशी मरतात आणि प्रकाशसंश्‍लेषण खंडित होते. प्रकाशसंश्‍लेषण मंदावल्यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. उसातील शर्करा व वजन घटते. रोगाचा प्रसार ७५ ते ८० टक्के आर्द्रता असलेल्या वातावरणात हवा, पावसाचे पाणी व दवबिंदूंमार्फत होतो.
तांबेरा - प.महाराष्ट्रातील नदीकाठच्या क्षेत्रात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूस होते. पानावर लांबट पिवळे ठिपके दिसतात. त्यांची लांबी वाढून रंग लालसर तपकिरी होतो. ठिपके मोठे होऊन नारंगी रंगाचे बिजाणू बाहेर पडतात. ओलसर दवबिंदूंच्या वातावरणात त्यांचा प्रसार होतो. ठिपक्‍यांमुळे पेशीद्रव्यपटल मृत होते. परिणामी प्रकाश संश्‍लेषण मंदावून ऊसवाढीवर विपरीत परिणाम होतो.

उपाययोजना - प्रमाणित, बीजप्रक्रिया केलेले, रसरशीत, निरोगी व योग्य वयाचे बियाणे वापरावे. खोडव्याचे बेणे लागणीसाठी टाळावे. वेळेवर आंतरमशागत करून शिफारशीत रासायनिक खतमात्रा द्याव्यात. हवेमार्फत पसरणाऱ्या रोगांपासून ऊस पिकाच्या संरक्षणासाठी सिलिकॉनची उपलब्धता महत्त्वाची असते. त्यामुळे एकरी ६ क्विंटल बगॅस राख अधिक सिलिकेट विरघळविणारे जीवाणू संवर्धन १ लिटर प्रमाणे वापरावे. रासायनिक नियंत्रण (दोन्ही रोगांसाठी), मॅन्कोझेब ३ ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल १ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात पंधरा दिवसांच्या अंतराने २ ते ३ फवारण्या कराव्यात.


शेतीलासंजीवनी-संजीवन कृषी पध्दती पुस्तक ऑर्डर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.


आडसाली ऊस
उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि अधिक आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खतमात्रेच्या ८० टक्के विद्राव्य खते दर आठवड्यातून एकदा या प्रमाणे २६ हप्त्यांमध्ये ठिबक सिंचनातून द्यावीत. आडसाली ऊस पिकास ठिबक सिंचनातून विद्राव्य खते देण्याचे वेळापत्रक (प्रति आठवडा प्रति एकर) १ ते ४ आठवडे - युरिया १०.५ किलो, १२:६१:०० २.२५ किलो, एम.ओ.पी. २.२५ किलो ५ ते ९ आठवडे - युरिया १९.५२० किलो, १२:६१:०० ६.२५ किलो, एम.ओ.पी. २.७५ किलो १० ते २० आठवडे - युरिया १२.५ किलो, १२:६१:०० ४.५ किलो, एम.ओ.पी. ३ किलो २१ ते २६ आठवडे - एमओपी ६ किलो


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Post a Comment (0)
Previous Post Next Post