सोयाबीन शेंगावरील करपा रोग तसेच तूर पिकातील पर्णगुच्छ व वांझ रोग उपाय.

 सोयाबीन

सततच्या पावसामुळे शेंगा करपा (रोगकारक बुरशी : कोलोटोट्रीकम ट्रन्‍कॅटम) या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामध्ये पाने, खोड व शेंगांवर अनियमित आकाराचे भुरकट, लालसर किंवा गर्द तपकिरी रंगाचे ठिपके पडतात व नंतर त्यावर काळे सूक्ष्म बुरशीपुंज दिसून येतात. शेंगांचा आकार लहान व पोचट राहतो आणि त्याचा बीजनिर्मितीवर विपरीत परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी, कार्बेन्डाझिम अधिक मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम किंवा टेब्यूकोनॅझोल (२५.९ इसी) १.२५ ते १.५ मिलि किंवा टेब्यूकोनॅझोल (१० %) + सल्फर (६५ % डब्ल्यूजी) हे संयुक्त बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आवश्यकतेनुसार पुढील फवारणी दहा दिवसांच्या अंतराने करावी.


संवेद फुगाँल ऑर्डर करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 

                                                       


तूर
विषाणूजन्य रोग व त्यांचे व्यवस्थापन
वांझ रोग - रोपावस्थेत झाडाच्या पानांवर प्रथम गोलाकार पिवळे डाग पडतात. अशी पाने आकाराने लहान पडून कालांतराने आकसतात. पाने पिवळी पडून झाडांच्या दोन पेरातील अंतर कमी होऊन त्यांना अनेक फुटवे फुटून झाडांची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले व शेंगा येत नाहीत व ती शेवटपर्यंत हिरवी राहून झुडपासारखी दिसतात. रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते पीक पक्व होण्याच्या अवस्थेपर्यंत कधीही होऊ शकतो. जास्त पाऊस, २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान व जास्त आर्द्रता रोगाच्या वाढीस पोषक आहेत.
उपाय - रोगग्रस्त झाडे वेळोवेळी उपटून टाकावीत. रोगवाहक कीड ‘एरिडोफाईट माईटस्‌च्या’ नियंत्रणासाठी, डायकोफॉल (१८.५ इसी) २.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आधीच्या हंगामातील बांधावरील तुरीचा खोडवा उपटून नष्ट करावा.
पर्णगुच्छ - या विषाणूजन्य रोगाचा प्रसार तुडतुड्यांमार्फत होतो. पर्णगुच्छयुक्त झाडे शेतामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आढळतात. झाडाच्या शेंड्याची वाढ थांबल्यामुळे आजूबाजूच्या फांद्या वाढतात. त्यामुळे झाडास पर्णगुच्छाचा आकार येतो. पीक फुलोऱ्यात असताना प्रादुर्भाव झाल्यास, फुलांची संख्या कमी होऊन ती छोट्या आकाराची, वाळलेली व पोपटी रंगाची दिसून येतात. शेंगा आकाराने लहान होऊन वेड्यावाकड्या स्वरूपात येतात. अशा शेंगांतील दाणे सुरकुतलेले दिसतात.
उपाय - रोगग्रस्त झाडे नष्ट करावीत. रोगवाहक किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० इसी) १ मिलि किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.३ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.


कृषिक अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
kr

 

Post a Comment (0)
Previous Post Next Post