सोयाबीन
खोडमाशी या किडीच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोष आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. प्रौढ माशी आकाराने लहान, काळसर आणि चमकदार असून २ मि.मी. लांब असते. संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये ७० ते ८० अंडी घालते. अंड्यातून निघालेली पाय नसलेली २-४ मि.मी. लांब अळी प्रथम सोयाबीनची पाने पोखरून नंतर पानाच्या देठातून मुख्य खोडात किंवा फांदीत प्रवेश करून आतील भाग पोखरून खाते. प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत झाल्यास कीडग्रस्त झाड वाळते. परिणामी, पुनःपेरणी करणे भाग पडते किंवा उत्पादनात लक्षणीय घट येते. मोठ्या झाडांवर प्रादुर्भाव झाल्यास प्रौढ माशीला बाहेर येण्यासाठी केलेले छिद्र आढळते. अळी आणि कोषावस्था फांद्यात किंवा खोडातच पूर्ण होते. प्रादुर्भावग्रस्त झाडावरील फुलांची गळ होते. उत्पादनात १६ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येते.
उपाययोजना - प्रादुर्भावग्रस्त पाने, फांद्या आणि पानाच्या देठाचा अळीसह नायनाट करावा. निंबोळी अर्क ५ टक्के किंवा कडुनिंबावर आधारित कीटकनाशक ॲझाडिरॅक्टीन (१०,००० पी.पी.एम.) ३ मि.लि. प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. आर्थिक नुकसानीची पातळी (१० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) ओलांडल्यास, इथिऑन (५० इसी) ३ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ०.७ मि.लि. किंवा क्लोरॲण्ट्रानिलीप्रोल (१८.५ एससी) ०.३ मि.लि. किंवा थायमेथोक्झाम (१२.६%) + लॅमडा सायहेलोथ्रीन (९.५% झेडसी) संयुक्त कीटकनाशक ०.२५ मि.लि. प्रतिलिटर पाणी यापैकी एका कीटकनाशकाची फवारणी करावी.
विहीर, कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण....
तूर
पीक साधारणतः ३५-४५ दिवसांचे असताना झाडांचे शेंडे मजुरांच्या साह्याने खुडून घ्यावे. या वेळी पाऊस सुरू असल्यास शेंडे खुडल्यामुळे झालेल्या जखमेतून बुरशीजन्य रोगाचा प्रसार होऊ शकतो. तो टाळण्यासाठी शिफारशीत बुरशीनाशकाची एक फवारणी घ्यावी. फांद्या धरण्याच्या अवस्थेला मुख्य शेंडा खुडून घेतल्यामुळे झाडाच्या बुडापासून फांद्या लागतात. झाडाचे बूड, खोड व फांद्यांची बळकट वाढ होते. साधारणतः ६५-८० दिवसांचे असतानाच्या दरम्यान बांबूच्या कमचीच्या साहाय्याने अथवा विळ्याच्या साहाय्याने झाडांचे शेंडे छाटून घ्यावे. याद्वारे पिकाची अतिरिक्त वाढ टाळली जाते. दोन्ही बाजूला पीक समप्रमाणात पसरते. या वेळी जमिनीत ओल असावी. पावसाळी वातावरण असल्यास वरीलप्रमाणे शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी द्यावी.